Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

महाराष्ट्रातील कला नृत्य नाटक चित्रपट, संगीत आणि पारंपारिक कला



महाराष्ट्रातील कला नृत्य नाटक चित्रपट, संगीत आणि पारंपारिक कला


प्राचीन मराठी साहित्य हे संस्कृत साहित्याचे ऋणाईत आहे. संस्कृतमध्ये काव्येषु रम्या असे नाटक आहे. भास, कालिदास व भवभूतीसारखा प्रतिभाशाली नाटकाकारांनी संस्कृत साहित्य संपन्न केलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात नाटकाचा निर्देश नाममात्रही नसला तरी नाटकाशी जवळीक साधू शक्तील असे काही लोककलाविशेष त्या काळातही आढळतात. कठपुतळीचा खेळ, बहूरूपी, भारूड, लळीत, गोंधळ, भजन, किर्तन इ. लोकप्रिय लोककलाविशेष त्या काळातही अस्तित्वात होते. त्यापैकि किर्तन म्हणजे काही नाटक नव्हे

महाराष्ट्र्रात मराठी भाषेचे रचलेले विष्णूदास भावे यांचे पहिले नाटक म्हणजे सीता स्वयंवर १८४३ होय. या नाटकाची मूळ प्रेरणा कानडी मुलखात रूढ असलेल्या यक्षगान नृत्यनाटकाची आहे. भावे यांच्या नाटकाचा एकुण रागरंग किर्तनातील आख्यानाचाच असे ज्याला सर्वार्थाने केवळ मराठी नाटक म्हणता येईल असे नाटक भावे यांच्या नाटकानंतर कित्येक दशकांनी उदयास आले.

अस्सल मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोंस्कर हे होत. त्यांनी कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र असे सौभद्र नाटक रचले.

सौभद्र हे एक अग्रगण्य असे संगीत नाटक आहे. या नाटकाचे तदनंतरच्या अर्धशतकातील मराठी नाटकाचा इतिहास घडवला. या नाटकाच्या जडणघडणीत प्राचीन संस्कृत आणि अर्वाचीन इंग्रजी नाटयरीतीचे संमिश्र असे विलक्षण रसायन आहे.

यानंतर आलेल्या गोविंद वल्लभ देवल यांनी किर्लोस्कराप्रमाणेच प्रथम विक्रमोर्वंशीय (१८८१), मृच्छकटिक (१८९०) या संस्कृत नाटकांचे मराठी संगीतानुवाद केले त्याशिवाय ऑथैल्लो नाटकाचे झुंजारराव (१८९०) हे त्यांचे रूपातरही प्रसिद्ध आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७२ ते १९३४) यांनी वीरतनय (१८९६) आणि मुकनायक (१९०१) सारख्या काही काही रोमॅंटिक कॉमिडिज रचलेल्या आहेत.

मराठी रंगभूमीच्या सुवर्णयुगाचा कालखंड हा खाडिलकरांचा बालगंधर्व या प्रतिभावान नाटककारांच्या नावान ओळखला जातो त्यांच्या काळात संगीत हेच मराठी नाटकाचे प्रधान आकर्षण व भूषण ठरले होते. राम गणेश गडकरी यांचे भावबंधन (१९१९) ही कॉमेडी व एकच प्याला (१९१९) ही ट्रॅजिडी ही रसिकमान्य आहेत आणि तद्नंतरच्या कित्येक नाटकांवर या नाटकांचे संस्कार स्पष्ट उमटलेले दिसतात.

मामा वरेरकर (१८८३ ते १९६४) यांनी स्वत:चीच एक नाटयशैली हा एकच एक नाटककार असा आहे कि ज्याने प्रचलित राजकिय व सामाजिक घटनांचे उदघाटन आपल्या नाटयकृतीतुन अव्याहतपणे केलेले आहे. हाच मुलाचा बाप (१९१७) हे हलके फुलके सामाजिक नाटक सत्तेचे गुलाम (१९२२) हे महात्मा गांधीच्या तत्कालीन राजकिय तत्वज्ञानाचा उदघोष करणारे राजकिय नाटक, सोन्याच्या कळस (१९३२) हे गिरणी मालक व गिरणी कामगार यांचा संघर्ष चित्रित करणारे पहिलेच नाटक, सारस्वत (१९४२) हे साहित्याविषयक समस्यांवरचे गंभीर नाटक आणि भुमिकन्या सीता (१९९५) ही उत्तररामचरिताची एक नवी व वेगळी वादळी ट्रॅजिडी या वरेरकरी या नाटकांचा निर्देश केल्याविना मराठी नाटयइतिहास पुरा होऊ शकणारा नाही आपल्या नाटकांच्या प्रयोगातील नेपथ्याबाबतही ते सदैव दक्ष असत.

मूके चित्रपट बोलु लागले आणि बोलपटांचा नवा जमाना सुरू झाला तेव्हा मराठी रंगभुमीचे सर्व सुत्रधार मोठया आशेने सिनेमाकडे वळले आणि १९३२ नंतरच्या पंचवीस वर्षाचा कालखंड म्हणजे मराठी नाटकाच्या मुच्र्छीतावस्थेचा काळ होय पण हाच काळ प्रायोगिक नाटकांसाठी उपयुक्त ठरला वर्तकांचे (१८९४ ते १९५०) आंधळयांची शाळा (१९३३) या नाटकातून मराठी रंगमंचावर अभूपुर्व असे इब्सेनयुग अवतरले तत्पूर्वीचे अर्धशतक हे संगीत नाटकाचे होते आणि ते शेक्सपियरयूग म्हणुन संबोधले जात होते.

मराठी रंगभूमिच्या या पडत्या काळात मराठी रंगभूमी जिवंत ठेवण्याचे श्रेय प्र्रामुख्याने आचार्य अत्रे व रांगणेकर यांच्यााकडे जाते अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार (१९३३) या नाटकाने पारंपारिक मराठी नाटयापेक्षा वेगळी अशी पद्धत अवलंबिली हे नाटक पूर्णत संवादावर आधारलेले असुन त्यात कथानकाला वाव नाही याव्यातिरिक्त घराबाहेर १९३४ आणि उद्याचा संसार १९३६ सारखी गंभीर प्रकृतीची सामाजिक नाटकेही त्यांी रचलेली आहेत रांगणेकरांचे कुलवधू १९४२ हे लोकप्रिय नाटक आहे.

व्यावसायिक मराठी नाटकाला वाईट दिवस आल्यानंतर बर्‍यास नाटककार नट नटी आणि दिग्दर्शक यांनी एकत्र येऊन मुंबईत कलाकार व रंगायन, पुण्यात प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिस्टस असोसिएश आणि नागपूरात रंजन कलामंदिर सारख्या नाटयसंस्थांची स्थापना केली होती. १९५७ मध्ये वसंत कानेटकरांनी वेडयाचे घर उन्हात या नावाचे एक स्वतंत्र मनोविशलेषणपर नाटक लिहिले वि. वा. शिरवाडकर यांच्या नाटय क्षेत्रातील कारकिर्दीतचची सुरूवात दूरचे दिवे (१९४६) या अनुवादित नाटकाने झाली. त्याचे नटसम्राट हे सर्वाधिक लोकप्रिय किंग लीयर ची आठवण करून देणारे असले तरी त्याची काव्यात्म प्रकृती नाटककारांच्या सत्वविशेष शैलीची द्योतक आहे कौंतेय (१९५३), ययाती व देवयानी (१९६८) यासारखी पौराणिक व दुसरा पेशवा (१९४७) आणि वीज धरतीला (१९७०) यांसारखी ऐतिहासिक पसटकेही रचलेली आहेत.

विजय तेंडुलकर या बंडखोर नाटककाराचे प्रमुख कर्तृत्व म्हणजे सुत्पावस्थेतील मराठी नाटकाच्या शरीरात नवे रक्त अंतर्भूत करण्याचे होय श्रीमंत (१९५५) व शांतता कोर्ट चालू आहे (१९६८) यांसारखी अनुवादीत नाटके त्यांनी रचलेली आहे. याशिविाय गिधाडे (१९७१) सखाराम बाईंडर (१९७२) बेबी (१९७५) व मित्राची गोष्ट (१९८२) ही त्यांची विविध प्रवृतींची दर्शन घडविणारी नाटके आहेत. त्यांचे घाशीराम कोतवाल (१९७२) हे अतिशय गाजलेले नाटक. भजन, किर्तन, गोंधळ, दशावतार तमाशा इ. अनेकविध लोकनाटय प्रकाराचे साभिप्राय मिश्रण या प्रयोगात आहेत.

सतीश आळेकरांनी महानिर्वाण (१९७४) नाटकात हिंदू औध्र्वदेहिक विधींचे व चालीरीतीचे औपहासिक विडंबन केले आहे. त्यातील संगीताचा घाट आहे. तो प्रामुख्याने भजन किर्तनाचा या नाटकाला उदंड लोकप्रियता लाभली आहे. विजय मेहता या सदैव नव्याच्या शोधात असणार्‍या नाटय दिग्दर्शिकेने आधुनिक नाटयसंहितांना परंपरागत लोकनाटकाचे रंगरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ब्रेख्तच्या कॉकेशियन चॉक र्सकलचा खानोलरकृत अनुवाद अजब न्याय वर्तृळाचा (१९७३) तमाशांच्या शैलीत सादर केला होता. त्याच्या सर्वात उल्लेखनीय प्रयोग म्हणजे हयवदन या नाटकाचा होय.

अशाप्रकारे मराठी नाटकाची सुरूवात ही संस्कृत नाटकाच्या संस्कृत नाटकाच्या संस्कारातुन सुरू होते संगीत हा सुरूवातीच्या मराठी नाटकांचा जीव आहे. तर या मराठी नाटयसृष्टीमध्ये झालेल्या शंभर सव्वाशे वर्षाच्या स्थित्यंतरात अलीकडे व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांची चलती आहे. कौटुंबिक, विनोदी, लोकनाटयाच्या पठडीतील नाटकांची मोठी चलती आहे. तर ऐतिहासिक पात्रांवर सादर होणारी नाटकेसुद्धा मराठी प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झालेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा