Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

महाराष्ट्राचा भुगोल

महाराष्ट्राचा भुगोल
सध्याच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळुन १नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. मध्य प्रांतातून व हैद्राबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. व गुजरात मुंबई राज्यातून वेगळे केले गेले.

स्थान – १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश

७२.३६ पुर्व ते – ८०.९ पुर्व रेखांश दरम्यान.

क्षेत्रफळ – ३.०७,७१३ चौ.कि.मी.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा राजस्थान, मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्र देशाच्या ९.३६% क्षेत्रफळाने व्यापलेला आहे.

लांबी – पुर्व पश्चिम लांबी ८०० कि.मी. व

उत्तर दक्षिण ७०० कि.मी. आहे.

राज्याच्या किनारपट्टीची लांबी – ७२० कि.मी.

नैसर्गिक सीमा –

महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत. उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.राज्याच्या ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे. राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.

राजकीय सीमा –

महाराष्ट्राला एकूण ६ राज्यांच्या सीमा स्पर्श करतात. यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्यप्रदेश बरोबर असून सर्वात कमी सिमा गोवा या राज्याबरोबर आहे. तसेच दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात सिमा लागते.
राज्य दिशा सिमेवरील चिन्ह एकूण
गुजरात वायव्य ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ४
मध्यप्रदेश उत्तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया ८
छत्तीसगढ पुर्व गोंदिया व गढचिरोली २
आंध्रप्रदेश आग्नेय गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड ४
कर्नाटक दक्षिण नांदेड, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग ७
गोवा दक्षिण सिंधुदुर्ग १

राज्याच्या वायव्येस असणारा केंद्रशासित प्रदेश – दादरा व नगरहवेली
दोन राज्यांना संलग्न आसणारे जिल्हे - धुळे, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग
राज्य स्थापनेच्या वेळी असणारे जिल्हे व प्रशासकीय विभाग – २६ व ४
महाराष्ट्रात असणारे एकून जिल्हे व तालुके – ३५ व ३५७
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने वर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्तरेकडच्या जिल्हा – नंदुरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक दक्षिणेकडचा जिल्हा – सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील सर्वाधिक पश्चिमेकडचा जिल्हा – ठाणे
सर्वाधिक जिल्ह्यांसोबत सिमा असणारा जिल्हा – अहमदनगर (एकूण सात जिल्ह्यांत)

जिल्हा विभाजन –

रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा केला – १ मे १९८१
औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्या वेगळा केला – १ मे १९८१
उस्मानाबाद मधुन लातूर वेगळा केला – १६ ऑगस्ट १९८२
चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा केला – २६ ऑगस्ट १९८२
बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर वेगळी केली – ४ ऑक्टोंबर १९९०
अकोला जिल्ह्यातून वाशिम वेगळा केला – १ जुलै १९९८
धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा केला – १ जुलै १९९८
परभणी जिल्ह्यातुन हिंगोली निर्मिती केली – १ मे १९९९
भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती कशी केली – १ मे १९९९
परभणी जिल्ह्यातुन हिंगोली निर्माण केला – १ मे १९९९

सध्या प्रस्तावित असणारे जिल्हे –

महाराष्ट्राची राजधानी – मुंबई
महाराष्ट्राची उप राजधानी हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण – नागपूर
रायगड जिल्ह्याचे (जुने नाव – कुलाबा) मुख्यालय – अलिबाग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय – आरोस बुद्रुक
मुंबई उप्नगर जिल्ह्याचे मुख्यालय – बांद्रा (पुर्व)
राज्याचे प्रशासकिय विभाग – राज्याचे मुख्य सहा प्रशासकिय विभाग असून १२ उपविभाग आहेत.
सर्वात मोठा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद (८ जिल्हे)

विभाग जिल्हे संख्या
कोकण उत्तरेकडून-ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ६
पुणे पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर्,सोलापूर ५
नाशिक अहमदनगर, नाशिक,धूळे, जळगाव, नंदुरबार ५
औरंगाबाद (मराठवाडा) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर ८
अमरावती (विदर्भ) अमरावती, यवंतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम ५
नागपूर (विदर्भ) नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,वर्धा ६

सर्वात मोठा प्रशासकीय विभाग – औरंगाबाद (८ जिल्हे)

विभागानुसार वाटून दिलेले कामे -
पुणे - शिक्षण, फलोद्यान, समाजकल्याण, सामाजिक वनिकरण, क्रिडा, साखर, नगरचना सहकार, शेती पशुसंवर्धन

मुंबई - माहिती प्रसिध्दी, दुग्धविकास, आरोग्य, उद्योग, विक्रीकर

नाशिक - आदिवासी कल्याण

नागपूर - खाणकाम व हातमाग

राज्यातील काही भागांतील वैशिष्ट्य पुर्ण नावे –

सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा सखल प्रदेश – कोकण
कोकणाचे प्राचीन नाव – अपरांत
सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा कोकणाचा भाग – तळ कोकण
सह्याद्री माथा तसेच त्याच्या लततचा पूर्वेकडील भाग – मावळ
सह्याद्रीच्या पुर्वेकडील पठाराचा पश्चिम भाग – देश
औरंगाबाद विभागातील आठ जिल्हे – विदर्भ
विदर्भाचा पुर्व भाग – झाडी
मध्य व पश्चिम भाग – व-हाड.
बॉम्बे स्टेटचे पहिले मुख्यमंत्री – बाळ गंगाधर खेर
महाराष्ट्र राज्याचे उद्गाटन केले – पंडीत नेहरु
पुणे विभागातील जिल्हे व नाशिक आणि अहदनगर मुळेउन बनणारा भाग – पश्चिम महाराष्ट्र
जळगांव धुळे नंदुरबार मिळून बनणारा भाग – (तापी खोरे) – खानदेश
द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

महाराष्ट्राचा बहुतांशी भाग ज्वालामुखी निर्मित बेसॉल्ट या खडकाचा बनलेला आहे. राज्यात जुने अनावृत्त खडक वैनगंगेच्या खो-यात आहेत. त्यानंतर विदर्भ व शेवटी तापी खोरे असा क्रम लागतो.

१. कोकण किनारा –

उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे.
अरबी समुद्रालगतच्या सखल भागास म्हणतात – खलाटी
कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी
कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९
रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा
कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड
महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई
राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई)
राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा
कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय
कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प – उरण (रायगड)
कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव
दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा
कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट.

२. पश्चिम घाट (सह्याद्री) –

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरातील चंदगड पर्यंतचा ८०० कि.मी. चा पट्टा म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे. याची सरासरी उंची ९०० मि. इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा उगम झाला आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.

सह्याद्रीच्या उपरांगा –

गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग – सातमाळ डोंगर
सातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर
पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग – हरिश्चंद्र बालाघाट
शंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठार

क्र. शिखर उंची (मी.) जिल्हा व वैशिष्ट्य
१ कळसूबाई १६४६ नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर)
२ साल्हेर १५६७ नाशिक व महाराष्ट्रातील द्विपीय क्रमांकाचे
३ महाबळेश्वर १४३८ सातारा
४ हरिश्चंद्र गड १४२४ अहमदनगर
५ सप्तश्रृंगी गड १४१६ नाशिक
६ त्रंबकेश्वर १३०४ नाशिक

घाट (खिंड) – उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घात म्हणतात.

सह्याद्रीतील प्रमुख घाट

घाट लांबी जोडलेली शहरे
थळघाट (कसारा) ७ नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३)
बोरघाट १५ पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४)
आंबाघाट ११ रत्नागिरी-कोल्हापूर
फोंडाघाट ९ कोल्हापूर-गोवा
आंबोली (रामघाट) १२ सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव
खंबाटकी (खंडाळा) पुणे-सातारा-बंगलोर
कुंभार्ली घाट चिपळूण (रत्नागिरी)-कराड
वरंधा घाट ६ भोर-महाड
दिवा घाट पुणे-सासवड मार्गे बारामती
माळ्शेज घाट आळेफाटा (पुणे)-कल्याण
नाणेघाट १२ अहमदनगर-मुंबई
पारघाट १० सातारा-रत्नागिरी
रणतोंडी घाट महाड-महाबळेश्वर
पसरणी घाट वाई-महाबळेश्वर
चंदनपूरी घाट नाशिक-पुणे
आंबेनळी महाबळेश्वर-पोलादपूर
ताम्हणी रायगड-पुणे

नर्मदा व तापी नद्यांची खोरे वगळी करणारी ही पर्वतरांग उत्तर सीमेवर आहे. सातपुडा पर्वातास आमरावती जिल्ह्यात गाविलगड, तर नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार (तोरणमाळ १४६१ मी.) म्हणतात.

दख्खनचे पठार –

हा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. २९ वेळा भेगी उद्रेक होऊन लाव्हा रसाचे थरावर थर साचून याचि निर्मिती झाली. हे पठार मुख्यतः बेसॉल्ट क्डकापासून झाली आहे. पठाराची सरासरी पश्च्मिमेकडील उंची ६० मी. व पूर्वेकडील उंची ३०० मी. म्हणजेच एकूण सरासरी उंची ४५० मी. आहे.

पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना बेसॉल्टची जाडी – कमी होत जाते.
दक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हाडक उघडे पडले आहे.
गोंडवाना क्षितीज स्मांतर थर थिजून सपाट घाटमाथे व पाय-या पाय-यांची रचना असणारी भूरुपे निर्माण होतात.

थंड हवेचे ठिकाण जिल्हा थंड हवेचे ठिकाण जिल्हा
तोरणमाळ नंदुरबार पाचगणी सातारा
खंडाळा पुणे माथेरान रायगड
रामटेक नागपूर चिखलदरा (गाविलगड) अमरावती
महाबळेश्वर सातारा लोणावळा, भिमाशंकर पुणे
जव्हार ठाणे मोखाडा, सुर्यामाळ ठाणे
आंबोली सिंधुदुर्ग येड्शी उस्मानाबाद
पन्हाळा कोल्हापूर म्हैसमाळ औरंगाबाद

नदी प्रणाली

महाराष्ट्रात प. घाट हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी असे प्रकार पडतात.

१) पश्चिम वाहिनी – या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. नर्मदा, तापी-पूर्णानध्या खचदरीतून वाहत जातात.

अ) तापी – ही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते. तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा व सण या नद्या येऊन मिळतात. तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.

तापी व पूर्णा संगम – चंगदेव क्षेत्र (जळगाव), तापी व पांझरा यांचा संगम – मुडावद धुळे

ब) कोकणातील नद्या –

सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – ४९ ते १५५ कि.मी.
कोकणातील नद्यांची वैशिष्टये – वेगवान व हंगामी असतात. त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.
कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी – उल्हास (१३० कि.मी.)
कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी – वैतरणा (१२४ कि.मी.)
उत्तर कोकणातील नद्या – दमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हास
मध्य कोकणातील नद्या – पाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री.
दक्षिण कोकणातील नद्या – कजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, व तेरेखोल

२) पुर्व वाहिनी नद्या – या सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.

अ) गोदावरी खोरे – गोदावरी खो-याने देशाचे १०% व राज्याचे ४९% क्षेत्र व्यापले आहे.

१) गोदावरी नदी – हिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे. गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात. गोदावरी राज्याचा ९ जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते. नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व ७ कि.मी. वाहत जाऊन परत आंध्रप्रदेशात जाते.
उपनदी उगम गोदावरी बरोबर संगम
दारणा कळसूबाई शिखराजवळ (इगतपूरी) दारणा सांगवी
प्रवरा भांदारद-याच्या ईशान्येस नेवाशाजवळ टोके
मुळा भंडारद-याच्या दक्षिणेला नेवाशाजवळ टोके
सिंदफणा बालाघाट डोंगर (बीड) माजलगाव
मांजरा पाटोडा पठार (बालाघाट) बीड कुंडलवाडी (नांदेड) ७२४ कि.मी.
कादवा तौला डोंगर (नाशिक)१२३१ नांदूरमधमेश्वर
शिवना सुरपालनाथ (सातमाळा) औरंगाबाद गंगापूरच्या अग्नेयेस
दुधना चौक्याचा डोंगर (औरंगाबाद) संगम प्ररभणी जिल्हा
पूर्णा शिरसाळा (अजिंठा डोंगर) संगम प्ररभणी जिल्हा

गोदावरी उपनदी-प्राणहिता

पेनगंगा नदी वर्धा नदीस येऊन मिळाल्यानंतर वर्धा व वैनगंगेचा संगम होतो. या प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. प्राणहिता नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस सिरोंचा जवळ गोदावरीला येऊन मिळते.
नदी लांबी(किमी) उगम मिळते
वर्धा ४५५ बैतुल (सातपूडा / मध्यप्रदेश) वैनगंगेस
पेनगंगा ७७६ अजिंठा टेकड्या बल्लापूर (यवतमाळ) येथे वर्धेस येऊन मिळते.
वैनगंगा ४६२ भाकल-दरकेसा टेकड्या मैकल (मध्यप्रदेश), उपनद्या – कन्हान, पेंच, बाग आष्टी जवळ वर्धा व वैनगंगा संगम होतो.
पेंच छिंदवाडा (मध्यप्रदेश) वैनगंगेस मिळते.
इंद्रावती ५३१ कलहंडी (मध्यप्रदेश) छत्तीसगढ – महाराष्ट्र सीमेवरून वाहते. भद्राचंल येथे गोदावरीस मिळते.

ब) भीमा खोरे – भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते. महाराष्ट्रात किचा प्रवाह ४५१ कि.मी. असून ती कर्नाटकात रायचुरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. किची एकूण लांबी ८६७ कि.मी. आहे. पंढरपूरजवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात. मुळा व मुठा या नद्यांचा संगम पुणे येथे होऊन त्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीला मिळतो. निरा नदी भोर जवळ उगम पावून भीमा नदीला येऊन मिळते. भीमेच्या प्रमुख उपनद्या उरवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.

क) कृष्णा नदी खोरे – कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्रात २८२ कि.मी. चा प्रवास क्रुन ती आंध्रप्रदेशात जाते. तिची एकूण लांबी १२८० कि.मी. आहे.

कृष्णा नदीच्या उपनद्या व त्यांचा संगम
उपनदी उगम कृष्णेबरोबर संगम
वेण्णा महाबळेश्वर माहुलीजवळ (सातारा)
कोयना महाबळेश्वर प्रितीसंगम कराड (सातारा)
पंचगंगा सह्याद्री कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त) मिळून नरसोबाची वाडी येथे कृष्णेस मिळते.
वारणा कोल्हापूरच्या ईशान्येस कोप-यात हरिपूर येथे कृष्णेस मिळते.
वेरळा ब्रम्हनाळ (सांगली)
तुंगभद्रा कर्नाटक संगमेश्वर (कर्नुल-कर्नाटक)

कोयना – कोयाना खो-यात राज्यातील सर्वाधिक जविद्युत निर्मिती होते. त्यामुळे कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात.
कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी व वशिष्ठी नदीत सोडतात.
महाराष्ट्रातील नद्यांची एकूण लांबी – ३२०० किमी.
महाराष्ट्रात नदी खोरे उतरता क्रम - १) गोदावरी २) भीमा ३) तापी ४) कृष्णा
महाराष्ट्रातील प्रवरा नदीतील धबधबा – रंध्रा फॉल्स ६० मी
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा – गोंदिया
प्रमुख तलाव – ताडोबा, घोडझरी, असोलामेंढा (चंद्रपुर), नवेगांव, बोदलकसा, चोरखमारा (गोंदिया),रामसागर (नागपूर), लोणार (बुलढाणा), अंबाझरी (नागपूर), आंध्रलेक (पुणे), धामापूर (रत्नागिरी),कळवण (पुणे), लेक बिले (अहमदनगर), व्हिक्टोरीया लेक (पुणे), सेवनी भंडारा
मुंबईस पाणीपुरवठा करणारे तलाव – भातसा, ताणसा, वैतरणा, पवई विहार (मुंबई)

नदी काठावरील शहरे नदी काठावरील शहरे
गोदावरी नाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगांव, राजमहेंद्री पंचगंगा कोल्हापूर
कृष्णा वाई, सागली, मिरज, औदुंबर, कराड, नरसोबाची वाडी इंद्रायणी देहू व आळंदी (पुणे)
पांझरा धुळे मौसम मालेगांव
क-हा जेजुरी भीमा पंढरपूर
सिना अहमदनगर प्रवरा नेवासे (संगमनेर)

महाराष्ट्रातून दोनदा वाहणा-या नद्या – माजरा, तापी, गोदावरी

नदी उपनद्या नदी उपनद्या
तापी पुर्णा, गिरणा द.पुर्णा दुधना, गिरजा
पुर्णा मोर्णा, काटेपुर्णा,नळगंगा कृष्णा कोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा
गोदावरी दारणा, कादवा, प्रवरा, मांजरा, सिंदफना, दक्षिण-पुर्णा, प्राणहिता (वर्धा+वैनगंगा) भिमा दुधनी, सिना, माण, निरा, धोंड, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, पवना, क-हा
वैनगंगा कन्हान, पेंच, वर्धा व पेनगंगा, सिंधफना

महाराष्ट्राचे हवामान

महाराष्ट्राचा हवामान प्रकार – उष्णकटिबंधीय मोसमी
महाराष्ट्रातील पर्जन्य – नैऋत्य मोसमी वा-यांपासून प्रतिरोध पर्जन्य पडतो.
कोकणातील पर्जन्याची वार्षिक सरासरी – २५०० ते ३५०० मिमी.
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण – ७२०० मिमी. अंबोली, सिंधुदुर्ग
कोकणात उन्हाळ्यात पडणारा पाऊस – आंबेसरी
पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारे जिल्हे – सोलापूर, अहमदनगर
अवर्षण ग्रस्त भागात पर्जन्यमान – ५०० मिमीहून कमी
महाराष्ट्रातील ऋतु संक्रमणाचा महिना – ऑक्टोबर
महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीची नोंद झालेली ठिकाणे – ०.६ मालेगांव (१९०२), देवळाली (१९६०)
वर्षभर सम व दमट हवामान आढळणारा विभाग – कोकण
सर्वाधिक तापमान कक्षा – नागपूर (१९ )
महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद – १) चंद्रपूर - (१६ मे १९१२) ४८.३ २) नागपुर – ४७.८ ३) जळगांव – ४७.८

वनस्पती जीवन

महाराष्ट्रातील जंगलांचे प्रकार – पाच
महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी वनांखालील क्षेत्र – २१.१०%
उपग्रह सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष दाट वने – ११ %
भारताच्या वनक्षेत्रांपैकी महाराष्ट्रात असणारी वने – ८.७%
महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले – लातूर
सर्वात कमी वनक्षेत्रांखालील असणारा विभाग – मराठवाडा (३०६%)
सागाची उत्कृष्ट जंगले सापडतात – चंद्रपूर (बल्लारशा)
महाराष्ट्र वनविकास मंडळाची स्थापना – १६ फेब्रुवारी १९७४ (नागपूर)
महाराष्ट्रातील जंगलाबाबतचे महाविद्यालय – अकोला
अमरावतीतील प्रसिध्द सागवनी लाकडाचा बाजार – परतवाडा
स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २००३ नुसार महाराष्ट्रात ६०,९३९ चौ.कि.मी. क्षेत्र वनांखाली होते. त्यापैकी दाट वने १७.२%, विरळ वने ४३.४%, ओपन फॉरेस्ट होते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली (३१७ चौ.कि.मी.)
सर्वाधिक क्षेत्र वनांखाली असणारा जिल्हा – गडचिरोली (७७%)
एकून जमिनीपैकी सर्वाधिक क्षेत्र विभाग – विदर्भ (३७%)
वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी पुळणीवर लागवड केली जाणारी वनस्पती – खडशेरणी
देशावर पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर लागवड करतात – निलगिरी व सुबाभूळ
कोकण विकास महामंडळ मर्यादित रबर प्रकल्प – कळंबिस्त (सिंधुदुर्ग)
औषधे व सुगंधित तेल निर्मितीसाठी उपयुक्त – सोशा गवत (धुळे जळगांव), मुशी गवत (ठाणे)
संत तुकाराम वन ग्राम योजना शासनाने सुरु केली – २००६-०७

उद्योग ठिकाण उद्योग ठिकाण
मधुमक्षिका पालन महाबळेश्वर लाकडी खेळणी पेण व सावंतवाडी
लाख निर्मिती गोंदिया सिट्रानेला तेल गाळणे देवरुख (रत्नागिरी)
टॅनिन आंबा (कोल्हापूर) कात निर्मिती मुंडवा, डाहणू,चंद्र्पूर
पामतेल सिंधुदुर्ग

टेंभूर्णी व आपट्याच्या पानापासून विड्या वळणे – सिन्नर (नाशिक), गोंदिया, तिरांडा, देवरी, आमगांव व सालेकसा (गोंदिया), भंडारा, तुमसर, मोहाडी (भंडारा), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) कामठी व नागरुर (नगपूर) व अहमदनगर
महाराष्ट्रातील रेशिम उत्पादन – बापेवाडा, एकोडी (भंडारा), साबळी व नागभींड (चंद्रपूर), तसर (टनक – रेशिम – एनाची पाने खाऊन) अमरावती
पश्चिम घाट बचाओ आंदोलन – बाबा फडके
आप्पिक्को (अलिंगन) – पांडुरंग हेगडे. (कर्नाटक)
चिपको आंदोलन – सुदर्लाल बहुगुणा व चंदीप्रसाद भट्टा

प्राणी संपत्ती/ अभयारण्ये/ राष्ट्रीय उद्याने

महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार – भीमाशंकर)
महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी.
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) ९० चौ.कि.मी.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य – माळढोक पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर) ८५०० चौ.कि.मी.
राज्यातील सर्वात लहान अभायारण्य – देउळ गांव- रेहेकुरी (अहमदनगर) ३ चौ.कि.मी.
राज्यातील १ ले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (रायगड)
महाराष्ट्रातुन नाहिसे झालेले प्राणी – चित्ता, चींकारे व काळविट
महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र – ताडोबा
राज्यातील १ ले व देशातील ३ रे सागरी राष्ट्रीय उद्यान – मालवण (सिंधुदुर्ग)
भारतातील सर्वात मोठे स्थलांतरीत व स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य – केवलादेव पाणपक्षी अभयारण्य
भारतातील १ ले व एकमेव मोर अभयारण्य – नायगांव (बीड)
राज्यातील सर्वात जुने अभयारण्य – राधानगरी (१९१८)

राष्ट्रीय उद्यान जिल्हा आढळणारे प्राणी
ताडोबा चंद्रपूर सांबर, गवा, हरिण, वाघ, निलगाय, चितळ
नवेगाव गोंदिया निलगाय, बिबट्या, भेकर, अस्वल
संजय गांधी बोरिवली बिबळे, वाघ, सांबर, भेकर, कोल्हे
पेंच (पं. जवाहरलाल नेहरु) नागपूर पट्टेदार वाघ, बिबटे, सांबर, चितळ
गुगामल/ढाकणे कोळखाज/मेळघाट अमरावती वाघ, जंगली रेडे, भेकर, सांबर, रानकोंबड्या
चांदोली सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी वाघ, बिबटे, गवे, अस्वल, सांबर
किनवट अभयारण्य यवतमाळ व नांदेड वाघ, बिबट्या, अस्वल, मोर
बोर वर्धा बिबट्या, सांबर
टिपेश्वर यवतमाळ व नांदेड मृगया
भीमाशंकर पुने व ठाणे शेकरु (खार)
राधानगरी दाजिपूर – कोल्हापूर गवे
नागझिरा गोंदिया वाघ, बिबट्या
देउळगांव – रेहेकुरी अहमदनगर काळवीट
माळढोक पक्षी अहमदनगर, सोलापूर माळढोक पक्षी
नांदुर – मध्यमेश्वर नाशिक पाणपक्षी
उजनी सोलापूर फ्लेमिंगो (रोहित) पक्षी
कर्नाळा रायगड पक्षी
तुंगारेश्वर ठाणे
अभयारण्य जिल्हा अभयारण्य जिल्हा
कोयना सातारा फणसाड रायगड
अंधारी चंद्रपुर कळसुबाई- हरिषचंद्र नगर अहमदनगर
गौताळा-औटरामघात जळगांव व औरंगाबाद अनेर धरण धुळे
यावल जळगाव तानसा ठाणे
नर्नाळा अकोला चपराळा गडचिरोलि
पेनगंगा यवतमाळ व नांदेड

जिल्हा वनोद्याने जिल्हा वनोद्याने
ठाणे अर्नाळा, वज्रेश्वरी सांगली दांडोबा डोंगर
औरंगाबाद हिमायतबाग, जायकवाडी, अजिंठा नाशिक गंगापुर, सप्तश्रृंगी
कोल्हापुर तबकबाग (पन्हाळा) आळते अमरावती चिखलदरा
जळगांव पाल, पद्मालय, पाटणादेवी बुलढाणा राणीबाग, लोणार, बुलढाणा
दिंधुदुर्ग आंबोली, नरेंद्र डोंगर सातारा महाबळेश्वर, प्रतापगढ
अमरावती चिखलदरा नागपुर रामटेक, सेमिनरी हिल
चंद्रपुर माणिकगड नंदुरबार तोरणमाळ

कृषी

राज्यातील वीज तपासणी यंत्रणा – पुणे, नागपुर, औरंगाबाद, परभणी, अकोला
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना – अकोला (१९७६)
महिला कृषी संशोधन संस्था – अमरावती
नाथ सिंडचे मुख्यालय – औरंगाबाद
महिको बियाणे – जालना
निंबकर कृषी अनुसंधान संस्था – फलटन (सातारा)

जलसिंचन

२०१० पर्यंत राज्यातील लागवडीखालील क्षेत्रांपैकी सिंचीत क्षेत्र – १७.५ (३९,५८,००० हेक्टर)
जमीन व पाण्याचा योग्य वापरासाठी प्रशिक्षण देणारी संस्था – वॉटर लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्युट (वॉल्मि) औरंगाबाद (१९८०-८१)
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) – नाशिक

प्रकल्पः-

१) जायकवाडी – जायकवाडी व पूर्णा अशा संयुक्त प्रकल्पाचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. गोदावरी नदीवर पैठणजवळ नाथसागर जलाशय तर सिंदफना नदीवर माजलगाव येथे मातीचे धरण बांधले होते. जायकवाडी प्रकल्पास जपान या देशाने सहाय्य केले.

केंद्राच्या मदतीने उभारलेले मत्स्य बीज केंद्र – अप्पर वर्धा
भाटपर हे धरण वेळवंडी या नदीच्या उपनदीवर बांधले आहे.
खडकवासला हे धरण अंबी, मोसी व मुठा या नद्यांवर बांधले आहे. तर पानशेत धरण या मुठेच्या उपनदीवर बांधले आहे.
नाशिक जवळील गोदावरी नदीवरील गंगापूर हे धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्राच्या विविध धरणांच्या जलाशयांची नावे
धरण जलाशयांची नावे
जायकवाडी यशवंतसागर
कोयना शिवाजी सागर
गोसीखुर्द (वैनगंगा) इंदिरानगर
खडकवासला बाजीपासलकर सागर
मुसा हुसेन सागर (आंध्रप्रदेश)
राधानगरी लक्ष्मीसागर
भंडारदरा (विल्सन डँम) अर्थर सरोवर
तोतला डोह मेघदूत जलाशाय
कोटा राणाप्रताप सागर (राजस्थान)
भाक्रा गोविंद सागर (हिमाचल प्रदेश)

महाराष्ट्रातील प्रकल्प, नदी व जिल्हा

धरण नदी जिल्हा
विर नीरा पुणे
पानशेत (तानाजी सागर) मुठा पुणे
वज्रचौड अग्रणी सांगली
गंगापूर गोदावरी नाशिक
मांजरा (निजाम सागर) मांजरा बीड
तिल्लारी तिल्लारी कोल्हापूर
अप्पर वर्धा सीमोरा अमरावती
नळगंगा नळगंगा बुलढाणा
सिध्देश्वर द. पूर्णा हिंगोली
काटेपुर्णा काटेपूर्णा अकोला
मोडकसागर वैतरणा ठाणे
खडकवासला मुठा पुणे
तेरणा तेरणा उस्मानाबाद
बोरी बोरी धुळे
धोम कृष्णा सातारा
बिंदुसरा बिंदुसरा बिड
उर्ध्वपैनगंगा पेनगंगा नांदेड, परभणी, यवंतमाळ
तापी प्रकल्प तापी (मुक्ताई सागर) हारनुर जळगाव
उजनी भीमा सोलापूर
मोर्णा मोर्णा अकोला
येलदरी द.पुर्णा जिंतुर (परभणी)
विष्णुपुरी सिंचन योजना नांदेड (शंकर सागर)
तानसा तानसा ठाणे
अप्पर तापी (गिरणा) तापी जळगांव
उर्ध्व गोदावरी गोदावरी नाशिक
तुळशी तुळशी कोल्हापूर
तोतला डोह पेंच नागपुर
मुळशी मुळा पुणे
बिंदुसरा बिंदुसरा बीड
माजलगांव सिंदफणा बीड
चाकसमान इंद्रायणी पुणे
इटियाडोह गाढ्वी गोंदिया
शिवाजी सागर कोयाना सातारा
सुर्या सुर्या ठाणे
ज्ञानेश्वर सागर मुळा अहमदनगर
वारणा वारणा कोल्हापूर
मालनगाव कान धुळे
काळ काळ रायगड
असलमेंढा पायरी चंद्रपूर
दारणा दारणा नाशिक
निळवंडे प्रवरा अहमदनगर
अडाण अडाण वाशिम
गोसीखुर्द वैनगंगा भंडारा (राष्ट्रीय धरण)
वाघुर वाघुर जळगांव

राज्यातील जलविद्युत प्रकल्प
प्रकल्प जिल्हा प्रकल्प
तिल्लारी कोल्हापूर भंडारदरा
भाटपर, पाणशेत पुणे पवना व वीर
खोपोली व भीवपुरी रायगड येलदरी
भिरा अवजल प्रवाह रायगड कोयना व धोम
कन्हेर, येवतेश्वर सातारा माजलगांव
अहमदनगर पेंच नागपुर
पुणे भातसा ठाणे
परभणी वैतरणा नाशिक
सातारा जायकवाडी औरंगाबाद
बीड चांदोली (वसंत सागर) कोल्हापूर

महाराष्ट्राचे आंतरराज्यीय प्रकल्प व सहकारी राज्य
प्रकल्प सहकारी राज्य प्रकल्प सहकारी राज्य
पेंच म. प्रदेश भोपाळपट्टनम छत्तीसगढ (इंद्रसागर)
दुधगंगा कर्नाटक (शाहु सागर) तिल्लारी गोवा
लेंडी आंध्रप्रदेश लोअर पेनगंगा आंध्रप्रदेश
कालीसागर म. प्रदेश बावथडी म. प्रदेश
नर्मदा म.प्रदेश, गुजरात, राजस्थान

महाराष्ट्राती औष्णिक विद्युत वीज केंद्रे
विद्युत केंद्र जिल्हा
चंद्रपूर चंद्रपूर
पोकारी (भुसावळ) जळगांव
खापरखेडा नागपुर
पारस अकोला
बल्लापूर चंद्रपूर
तुर्भे मुंबई
चोला (कल्याण) ठाणे
परळी-वैजनाथ बीड
डहाणू ठाणे
कोराडी नागपुर
एकलहरे नाशिक

भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प – तारापूर (ठाणे) १९५९
महाराष्ट्रातील पहिला पवन उर्जा प्रकल्प – जमसांडे (देवगड – सिंधुदुर्ग)
सौरउर्जा प्रकल्प – खोपडी (सिन्नर)
आशियातील मोठा पवन उर्जा प्रकल्प वनकुसवडे (सातारा)
सार्वाधिक क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र – चंद्रपूर
सौर उर्जेत अग्रेसर जिल्हा – औरंगाबाद
राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)

खनिज संपत्ती

महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात खोरे व कोकणात खनिजे सापडतात.
देशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा – ३.३%, महाराष्ट्रात ३८,००० चौ.कि.मी. (१३.३७%) क्षेत्रात खनिजे सापडतात.
महाराष्ट्रात देशाच्या ५०% बॉक्साईट साठे, व २१% उत्पादन होते. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा इ. ठिकाणी बॉक्साईटच्या खाणी आहेत.
देशातील मँगनिज (मंगल) च्या साठ्यांपैकी ४०% साठे महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रात तुसर, बुझुरग व चिखलगाव (भंडारा), सावनेर व रामटेक (नागपूर), सावंतवाडी, व वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. महाराष्ट्रात देउळगाव (गडचिरोली), चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी व रेडी (सिंधुदुर्ग) येथे खाणी आहेत. रेडी या बंदरातून लोह खनिज निर्यात केले जाते.
देशाच्या ४% कोळसा महाराष्ट्रात सापडतो. हे साठे वर्धा वैनगंगेच्या खो-यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळशाचे साठे – बल्लारपूर (चंद्रपूर) येथे आहेत. तसेच कामठी व उम्रेड (नागपूर), वणी (यवंतमाळ), गडचिरोली जिल्ह्यातही कोळसा सापडतो.
कायनाईटचे १५% साठे महाराष्ट्रात आह्ते. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात देहगाव, पिंपळगांव, मोगरा, मीरगा इ. तसेच गार्काभोंगा तालुक्यात कयनाईट व सिलिमिनाईटचे साठे आहेत.
कायनाईटचे उपयोग हि-यांना पैलू पाडणे, काच, रसायन उद्योगात होते.
भारताच्या ९% चुनखडीचे साठे व २% उत्पादन महाराष्ट्रात होते. यवतमाळ जिल्ह्यात मांजरी, वांजरी, शिंदोला, मुकवटन येथे चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत. तसेच चंद्रपुर, अहमदनगर व गड्चोरोली येथेही साठे सापडतात.
महाराष्ट्रातील मँगनिज शुध्दीकरण प्रकल्प – तुसर (भंडारा) व कन्हान (नागपूर) येथे आहेत.
हिरव्या अभ्रकात सिलियम भंडारा जिल्ह्यात सापडते.
देशातील क्रोमाईटच्या साठ्यांपैकी १०% साठा महाराष्ट्रात असुन प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यात साठे आहेत. टाका (नागपूर), मौली (भंडारा), कनकवली, जानोली (सिंधुदुर्ग), क्रोमाईटचा उपयोग धातू उद्योगात किंमती खड्यांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात होतो.

खनिज उत्पादक जिल्हे खनिज उत्पादक जिल्हे
चुनखडी यवतमाळ कायनाईट देहगाव (भंडारा)
तांबे चंद्रपूर बरायटीस कोल्हापुर, रत्नागिरी
शिसे, जस्त, गंलियम नागपूर गारहोटी व सिलिका सिंधुदुर्ग
ग्राफाईट सिंधुदुर्ग क्वॉर्टझाईट भंडारा
क्लोराईट चंद्रपूर व्हँनेडियम भंडारा, गोंदिया
चिनीमाती रत्नागिरी सिझियम भंडारा, गोंदिया
जिप्सम सिंधुदुर्ग, अहमदनगर अँसबेस्टॉस अहमदनगर
संगमरवर अमरावती, नागपूर रसायने निर्माती अंबरनाथ
नैसर्गिक वायु उरण बॉक्साईट कोल्हापुर
कोळसा चंद्रपूर, नागपुर लोह चंद्रपुर, गडचिरोली
खनिज तेल रत्नागिरी, बॉम्बेहाय क्रोमाईट भंडारा, सिधुदुर्ग
भट्टीचीमाती सिधुदुर्ग भांड्यांची माती चंद्रपूर, नागपुर
डोलोमाईट चंद्रपुर, यवतमाळ क्रोमाईट भंडारा, सिधुदुर्ग

उद्योगधंदे

उद्योगधंद्यात महाराष्ट्र भारतात अग्रेसर आहे. भारताच्या एकुण औद्योगिक उत्पादनाच्या स्थुल मुल्यांपैकी २१% स्थुल उत्पादन मुल्य महाराष्ट्रात होते.
उद्योगधंद्यांना विकसित भूखंड, रस्ते, पाणी, तयार गाळे ई. सोयी पुरविणारे महामंडळ – महाराष्ट् औद्योगिक विकास महामंडळ-१९६३
एम.आय.डी.सी. व सिडकोने राज्यात ३६ आय.टी.पार्क विससीत केले असून खाजगी २५३ आय.टी. पार्क पैकी ४६ आय.टी. पार्क चे काम सुरु आहे.
३१ मार्च २०१० प्रर्यंत एम.आय.डी.सी. ने २६० औद्योगिक वसाहती विकसित केल्या होत्या. त्यात ३०,३३५ कारखाने होते व ८.८० लाख इतका रोजगार उपलब्ध करुन दिला.
अविकसित भागात नव्याने उद्योग स्थापण्यासाठी मध्यम व मोठ्या उद्योगांना वित्तीय सहाय्य पुरविणारे तसेच प्रदेशस्थ भारतीयांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे, एकत्रित प्रोत्साहन योजना राबविणारे महामंडळ – महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणुक महामंडळ (सिकॉम) १९६६
लघु व मद्यम उद्योगांना स्थावर मालमत्ता घेण्यासाठी गिर्घकालीन वित्त पुरवठा करणारी संस्था – महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ -१९६२
महावित्तचे कार्यक्षेत्र – महाराष्ट्र, गोवा, दीव व दमण
लघुउद्योगांना कच्चा मल पुरविणे, त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीची, साठवणुकीची व्यवस्था, करणे. आयातीस सहाय्य व निर्यातीस प्रोत्साहन देते – महाराष्ट्र राज्य लधुउद्योग विकास महामंडळ-१९६२
राज्यातील एम.एस.एस. आय.डी.सी.ची २००९-१० मध्ये उलाढाल – ३२७.५१ कोटी
स्टिल अँथँरिटी ऑफ इंडियाच्या लोखंड व पोलाद वितरणासाठी राज्यातील जबाबदारी – महाराष्ट्र राज्य लघु विकास महामंडळाची
महाराष्ट्र ईलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन (मेल्टॉन) – मुंबई (१९७८)
लघु व कुटिर उद्योगांना सर्व सहाय्य एकत्रितपणे मिळण्यासाठी केंद्राने सुरू केलेली योजना – जिल्हा उद्योग केंद्र (१९७८) (जॉर्ज फर्नांडिस)
जगातील कानाकोप-यात मराठी व्यावसायिक व उद्योजकांना एक्त्र क्रुन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन झालेली संस्था – मरठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रिज (१९९४ च्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनात स्थापन)
महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान धोरण – १५ ऑगस्ट १९९८
महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान वर्ष – १९९९
महाराष्ट्रात एकूण १०४ कापड गिरण्या आहेत. त्यापैकी एक्ट्या मुंबईत ५४ गिरण्या आहेत.
भारताच्या मागांच्या संख्येत महाराष्ट्र पहिला, चात्यांच्या संख्येत दुसराव कापड गिरण्यांच्या संख्येत तिस-या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रातील हातमागांची प्रमुख केंद्रे – नागपूर व सोलापूर
राज्यात सर्वाधिक हातमाग – मालेगाव
महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळ – नागपूर
महाराष्ट्रातील वीज मागावर कापड निर्मिती करणारी प्रमुख केंद्रे – भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी
भारतातील सर्वांत मोठी सहकारी सुतगिरणी – इचलकरंजी
महाराष्ट्र राज्य यंत्रमाग माहामंडळ – पुणे
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ – मुंबई
देशातील पहिली सहकारी सुतगिरणी – जिल्हा विणकर सहकारी संस्था (इचलकरंजी) कोहापुर
महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनात देशात आघाडीवर असून ३४% जास्त साखर उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते.
महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना १९२० मध्ये बेलापूर (अहमदनगर) येथे सुरु झाला.
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर (लोणी-अहमदनगर) येथे १९४९ मध्ये सुरु झाला.
भारतातील सर्वाधिक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.
प्रादेशिक दृट्या विचार करता पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग केंद्रीत झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत.
आशिया खंडातील सर्वाधिक गाळण क्षमता असणारा साखर कारखाना – वसंतदादा सहकारी साखर कारखाना, सांगली
२००८ मध्ये भारतात एकूण ६१५ साखर कारखाने होते. त्यापैकी महाराष्ट्रात १८८ साखरकारखाने होते. सध्या राज्यात २०१ नोंदणीकृत साखर कारखाने असून त्यापैकी १७२ सहकारी क्षेत्रातील आहेत. २०१ कारखान्यांपैकी १४१ कारखाने चालू असून त्यापैकी १०३ कारखाने तोट्यात आहेत.
२००६-०७ मध्ये देशात ३१७ सहकारी साखर कारखाने होते. पैकी महाराष्ट्रात १६५ सहकारी साखर कारखाने होते.
साखर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राची साखर उत्पादन ९०.९९ लाख टन होते. तर उर्वरित भारताचे १९२ लाख टन होते.
१ मार्च २००२ च्या शासनाच्या धोरणानुसार खुल्या बाजारातील साखार व लेव्ही साखरेचे प्रमाण – ९:१
महाराष्ट्राच्या औद्योगिक उत्पादनात रसायने व रासायनिक पदार्थांच्या सर्वाधिक वाटा (१८.७%) आहे. त्यानंतर खाद्यवस्तू (१४.५%), सुती कापड व तयार कपडे (८.३%) यांचा क्रमांक लागतो.
रासायनिक वस्तुंचे ४०% उत्पादन एक्ट्या महाराष्ट्रात होते.
महाराष्ट्रातील पहिला सिमेंट कारखाना – चंद्रपुर
वनस्प्तती तूप निर्मिती पाचोरा (जळगांव) येथे होते.
देशातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत – इचलकरंजी
सैनिकांनी सैनिकासाठी चालवलेली एकमेव सहकारी बँक – सातारा
सिडकोची स्थापना – १९७०
महाराष्ट्रातील विशेष आर्थिक क्षेत्र – १) द्रोणगीरी (नवी मुंबई) २) बुटीबोरी (नागपुर) ३) कागल (कोल्हापुर) ४) सिन्नर (नाशिक) ५) शेंद्रे (औरंगाबाद) ६) गुहागार (रत्नागिरी)
शेतमाल निर्यात क्षेत्र – पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर व सातारा
हिरे व अभूषणे पार्क – नवापूर (नंदुरबार)
टेक्साटाईल पार्क व मिहान प्रकल्प (कलकूड) – मणेराजूरी (सांगली), बुटीबोरी (नागपुर) फ्लोरिकल्चर पार्क – तळेगांव (पुणे),
भारतातील प्रमुख आय.टी. पार्क – साल्टलेक सिटी (कोलकाता), सायबराबाद (हैद्राबाद), पुणे, अहमदाबाद, बंगळ्रुर, कोहिमतपूर

उद्योग प्रमुख केंद्र
शेती अवजारे व ऑईल इंजिन सातारा,पुणे,इचलकरंजी,कोल्हापूर,किर्लोसकरवाडी
कागद गिरण्या बल्लारपूर(चंद्रपूर), खेपोली (रायगड), भिगवन (इंद्रापूर), थेरगाव (चिंचवड-पुणे)
खत कारखाने तुर्भे(मुंबई) व थळ वायशेत (रायगड)
कचेच्या वस्तू चंद्रपूर, तळेगाव (पुणे), ओगलेवाडी, बागणी (सांगली)
आडकित्ते उद्गिर (लातूर)

डिसेंबर २०१० अखेर २३३ विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) चे प्रस्ताव प्रप्त झाले होते. त्यापैकी १४३ प्रस्ताव मान्य करण्यात आले आसून ६३ पूर्वीच अधिसूचित झालेले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव आय.टी. क्षेत्रात आहेत.

लघुउद्योग केंद्र लघुउद्योग केंद्र
पीतांबर व पैठण्या येवले (नाशिक) साड्या व लुगडी इचलकरंजी
हिमरु शाली औरंगाबाद सुती व रेशमी साड्या नागपूर, अहमदनगर
पैठण्या व शालू पैठण पामतेल गिरणी सिंधुदुर्ग
खेळणी सावंतवाडी विडी उद्योग सिन्नर, गोंदिया
चर्मोद्योग कोल्हापूर गुजराती फेटे पैंठण

वीज निर्मिती

२००९-१० मध्ये महाराष्ट्राची स्थापीत क्षमता – १) औष्णिक विद्युत – ८८२५ मे.वॅ. २) जलविद्युत – २९१६ मे.वॅ. ३) नैसर्गिक वायु – १७२२ मे.वॅ. ४) बंदिस्त – १०५१ मे.वॅ. ५) अपारंपारिक – २८०७ मे.वॅ. ६) अणु विद्युत – ३९३ मे.वॅ. अशी एकूण १७३७१ मे.वॅ. इतकी क्षमता आहे.
२०१०-११ या वर्षात एकुण १६,६१५ मे.वॅ. इतकी मागणी होती. त्यामुळे ५४९६ मे.वॅ. इतकी लोड शेडींग करावी लागली.
२००७-०८ या वर्षात १७,४९८ मे.वॅ. इतक्या विजेच्या मागणीमुळे ४६१८ मे.वॅ. विजेचे लोड शेडींग करण्यात आले.
राज्याची ट्रान्समिशनमधील विजेची गळती २००९-१० मध्ये – ४.४%
राज्याची २००९-१० मधील वितरणामधील विजेची गळती – २००६%
महाराष्ट्राने २०१२ प्रयांत भारनियमानातून मुक्ती मिळविण्यासाठी ६५०० मे.वॅ. विज निर्मितीचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्रात वीज निर्मितीचे स्त्रोत्र – ५१% वीज औष्णिक, १७% जलविद्युतपासून, ११% नैसर्गिक वायुपासून व % अणूपासून मिळते.
विजेचा वापर (२००९-१० च्या आकडेवारीनुसार)- १) औद्योगिक – ३९% २) कृषी – १८% ३) घरगुती – २३% ४) वाणिज्यीक – ११.२% ५) रेल्वे ३.२% आणि ६) इतर ४.२% असा होता.
भारतातील पहिली अणूभट्टी ४ ऑगस्ट १९५६ रोजी तुर्भे येथे सुरु झाली. तिचे नाव अप्सरा असे आहे. त्यानंतर १९६० मध्ये सारस, १९६१ मध्ये झर्लिन व पुर्णिमा या अणूभट्ट्या य्द्योगांना वीज पुरवठा करते.
वीजमंडळाच्या पुरर्रचनेबाबत राज्य सरकारने डॉ. माधवराव गोडबोले. यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समीतीने जुलै २००१ मध्ये आपला अहवाल दिला होता.
महाराष्ट्र राज्य वीज नियमन आयोगाची स्थापना – १९९९
कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात १३ मार्च १९९९ मध्ये ऑर्वेजियन तंत्रज्ञानाने लेक टॅपिंगचा आशिया खंडातील पहिला प्रयोग केला. त्यातून या प्रकल्पाची वीज निर्मितीची एकूण क्षमता १९२० मे.वॅ. झाली.
केंद्रिय जलविद्युत संशोधन संस्था – खडकवासला
महाराष्ट्राच्या ग्रामीण विद्युतीकरणाचे उदिष्ट्ये साध्य – मार्च १९८९ अखेर.

वाहतूक व दळणवळण

रस्ते

रस्त्यांचे वर्गीकरण करणारी रस्त्यांबाबतची योजना – नागपूर योजना (१९४१-६९)
राज्यात महाराष्ट्राच्या आर्थिक पहाणी नुसार २,४०,०४० किमी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी मार्च – २०१० पर्यंत

राष्ट्रीय महामार्ग – ४३७६ किमी

राज्य महामार्ग – ३४,१०२ किमी

प्रमुख जिल्हा रस्ते – ४९,९०१ किमी

इतर जिल्हा रस्ते – ४६,१०२ किमी

ग्रामीण रस्ते – १,०४,८४४

देशाच्या एकूण राष्ट्रीय महामार्गांपैकी महाराष्ट्रात – ४३७६ किमी (मार्च २०१० अन्वये) लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.
राज्यातील सर्वात मोठा महामार्ग – क्र. ६ (धुळे-कोलकाता)
राज्यातील सर्वात लहान महामार्ग – क्र. ४ ब (नाव्हाशेवा-पळस्पे-२७ किमी)
राज्यात सुरु होऊन राज्यातच संपणारे महामार्ग – १) पुणे-नाशिक – क्र. ५० २) महामार्ग क्र. ४ व ३) रत्नागिरी-कोल्हापूर क्र. २०४ ४) सोलापुर-धुळे क्र. २११
राज्यांची रस्त्यांची घनता (१०० चौ कि.मी. मार्गे) – ८७ कि.मी.
रस्त्याच्या घनेतत महाराष्ट्राचा क्रमांक – ४ तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.
रस्ते बांधणीला चालना देण्यासाठी १९९६ साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
या महामंडळाने बांधा वापरा व हस्तांतरित करा हे तत्व अवलंबिले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग एम.एस.आर.डी.सी. नेच बांधला आहे.
एम.एस.आर.डी.सी. चे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ५० उड्डान पुल व २९ रेल्वे मार्गावरील उड्डान पूल बांधण्याचे काम चालू आहे.
भारतील सर्वाधिक लांबीचे रस्ते महाराष्ट्रात आहेत.

रेल्वे

मार्च २०१० अखेर देशातील ६४,७५५ कि.मी लोहमार्गंपैकी राज्यातून ५,९८३ कि.मी ९९.४%) लांबीचे रेल्वे मार्ग जातात.
महाराष्ट्रात प्रमुख सहा लोहमार्ग जातात.
महाराष्ट्रातील ७२.७% मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे.
राज्यातील लोहमार्गांची घनता १९.४४ कि.मी. असून महाराष्ट्र भारतात घनतेच्या बाबतीत चौदाव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक घनता सोलापूर जिल्ह्यात आहे. (भारताची रेल्वेची घनता १९.६९ कि.मी. इतकी आहे.)
कोकण रेल्वे कोकणातील सर्व जिल्ह्यातून जाते. तिच्या ८४३ कि.मी. लांबी महाराष्ट्रात आहे.
कोकण रेल्वे औपचारिक उद्गघाटन १ मे १९९८ रोजी झाले. या मार्गावर ताशी १६० कि.मी. वेगाने जाणा-या वेगाने जाणा-या बुलेटनची चाचणी घेण्यात आली.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाची स्थापना – १९९८
तीनही प्रकारचे रेले मार्ग एकत्र येतात – मिरज
महाराष्ट्रातील दुमजली गाडी – सिंहगड एक्स्प्रेस (पुणे-मुंबई)
महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर व गोंदिया दरम्यान धावते.
मध्य रेल्वेने राज्यात पर्यटनाचा विकास होण्यासाठी १६ जाने. २००४ पासून डेक्कन ऑडिसी ही लक्झरी पर्यटन रेल्वे सुरु केली आहे. ही रेल्वे मुंबई-जयगड-गणपती पुळे-रत्नागिरी-भाट्ये बीच-सिधुदुर्ग-तरकारली-सावंतवाडी-गोवा-पुणे-औरंगाबाद-अजिंठा व वेरुळ आणि नाशिक इ. स्थळांची सफर घडविते.
महाराष्ट्रात सरासरी ६००० व्यक्तींना एक टपाल कचेरी सेवा पुरविते हे प्रमाण २५.७७ चौ.कि.मी. क एक टपाल कचेरी इतके आहे.
भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र- आर्वी (जुन्नर-जि.पुणे) येथे १९७१ मध्ये स्थापन झाले. तर दुसरे केंद्र १९७६ मध्ये डेहराडून येथे स्थापन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय संपर्क सेवेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्यात केंद्राने उभारलेली केंद्रे – नागपूर व मुंबई
नियततालिकांच्या प्रसारणाच्या बाबतीत उतरता क्रमांक – १) उत्तर प्रदेश २) दिल्ली ३) महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य लोक साहित्य मंडळाची स्थापना – १९५६
मराठी भाषा व साहित्याचा सर्वांगिण विकास करणे तसेच इतिहास व कला क्षेत्रातील वारसा जपण्यासाठी १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेची स्थापना झाली.
महाराष्ट्रातील नियोजित उपग्रह स्थानक – न्हावाशेवा (रायगड)
राज्य शासन छोट्या ४८ बंदरांचा विकास करण्यासाठी बांधा, मालक व्हा, चालवा व हस्तांतरित करा या तत्वाचा वापर करणार आहे. त्यासाठी १९६६ मध्ये महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत रेवस आवारे हे बहुउपयोगी बंदर व दिघी हे बंदर रासायनिक पदार्थांचे स्थान म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

पर्यटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना – १९७५
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे पर्यटन धोरण जाहिर – २००६
महाराष्ट्रातील पुळणी – जुहू (मुंबई), मार्व, वर्सोवा, मनोरी (मुंबई, उपनगर), गणपती पुळे (रत्नागिरी), मुरुड व किहिम (रायगड) व अकलोली (ठाणे), उनकेश्वर (ठाणे), उनकेश्वर (नांदेड), सालबर्डी (अमरावती), कापेश्वर (यमतमाळ), उन्ह्वरे – ताम्हले, खेड, अरवली, तुरळ, गोळवली मठाराजवाडी, फणसवणे (रत्नागिरी)
महाराष्ट्राचे शासकीय मध्यवर्ती संग्राहालय – नागपूर
प्रादेशिक वस्तु संग्राहालय – औरंगाबाद, नाशिक
चंद्रकांत मांडरे कला संग्राहालय – कोल्हापूर
प्रिन्स ऑफ वेल्स संग्राहालय – मुंबई

महाराष्ट्रातील अष्टविनायक
स्थळ गणपती स्थळ गणपती
मोरगाव (पुणे) मोरेश्वर रांजनगांव (पुणे) श्री महागणपती
थेऊर चितामणी मढ / महड (रायगड) श्री विनायक
ओझर (पुणे) विघ्नहर पाली (रायगड) बल्लाळेश्वर
लेण्याद्री (पुणे) गिरिजात्मक सिध्द्टेक (अहमदनगर) सिध्दीविनायक

लेणी
लेणी जिल्हा लेणी जिल्हा
पितळखोरा औरंगाबाद बेडसा कामशेत-पुणे
वेरुळ-अजिंठा औरंगाबाद भाजे मळवली-पुणे
एलिफंटा घारापुरी- रायगड कार्ला पुणे
पांडव लेणे नाशिक खरोसा लातूर
पातुर अकोला तेर उस्मानाबाद
धाराशिव उस्मानाबाद कान्हेरी ठाणे

महात्मा फुले वस्तू संग्रहालय व राजा केळकर वस्तू संग्रहालय – पुणे
तेरणा नदी काठी असणारे संत गोरा कुंभार यांची समाधी असणारे ठिकाण – तेर (जि. उस्मानाबाद)
महादेव भाई व कस्तुरबा गांधींची समाधी असणारे ठिकाण – आगाखान पॅलेस (पुणे)
महाराष्ट्रातील लजदुर्ग – सुवर्णदुर्ग (रत्नागिरी), मुरुड, जंजिरा, पद्मदुर्ग (रायगड), अर्नाळा (ठाणे)
संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेले ठिकाण – आळंदी (पुणे)
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरा काठचे ठिकाण – नेवासे
नाग पंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरणारे ठिकाण – बत्तीस शिराळा (सांगली)
विवेकसिंधू (मराठीतील आद्यग्रंथ) हा ग्रंथ लिहिणारा मुकुंदराव व ओव्या, अभंग लिहिणारा दासोपंत यांचे जन्मस्थान व समाधी स्थळ – अंबाजोगाई (बीड)

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले
जिल्हा किल्ले जिल्हा किल्ले
नाशिक अंकाई-टंकाई, साल्हेर-मल्हेर, मांगी-तुंगी, ब्रम्हगिरी रांजनगांव (पुणे) श्री महागणपती
अहमदनगर हरिश्चंद्रगड, रतनगड, व अहमदनगरचा भुईकोट किल्ला पुणे सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, तोरणा, प्रचंडगड, राजगड
कोल्हापुर पहाळा, विशालगड, गगनगड, भडर्गड, रायगड रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी
सातारा प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, मकरंदगड औरंगाबाद देवगिरी (दौलताबाद)

प्रभू रामचंद्रांचे निवास असणारे व कवी कालीदासाने मेघदूत हे महाकाव्य लिहिले ते ठिकाण – रामटेक (नागपूर)
महाराष्ट्राचे संत विद्यापीठ – पैठण
दक्षिणेची काशी म्हणून ओळखतात – पैठण
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे – तुळजाभवानी (तुळजापूर-उस्मानाबाद), अंबाबाई (कोल्हापूर), रेणूका माता (माहूर – नांदेड), सप्तश्रृंगी (अर्धे शक्तीपीठ वणी-नाशिक)
महाराष्ट्राची काशी – पंढरपूर
शिवाजी महाराजांचे मंदिर – सिंधुदुर्ग किल्ला

राज्यातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळे
स्थळ जिल्हा स्थळ जिल्हा
टिटवाळे ठाणे चाफळ (मारूती) सातारा
पंढरपूर सोलापूर बाहुबली कोल्हापुर
जेजुरी (खंडोबा) पुणे शेगाव बुलढाणा
हाजिमलंग कल्याण (ठाणे) महाकालेश्वर सासुरे (सोलापूर)
जाहांगीर आर्ट गॅलरी मुंबई ज्योतिबा कोल्हापूर
सिताबर्डीचा किल्ला नागपूर चित्रपट नगरी कोल्हापूर
चांदबिबीचा महाल अहमदनगर बिबी का मकबरा औरंगाबाद
राजाबाई टॉवर मुंबई हॅगिंग गार्डन मुंबई

शिक्षण

महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ – मुंबई विद्यापीठ (१८५७)
पुणे विद्यापीठाची स्थापना – पुणे (१९४८)
महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ – SNDT (१९५०)
मराठवाडा विद्यापीठाची स्थापना १९५८ मध्ये औरंगाबाद येथे झाली. १४ जानेवारी १९९४ रोजी त्याचा नामविस्तार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला.
महाराष्ट्रातील पहिले मुक्त विद्यापीठ – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, (नाशिक) १९८९
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ – १० जून १९९८ (नाशिक)
कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ – नागपूर (१९९३)
शिव छत्रपती क्रिडा विद्यापीठ – पुणे (१९९६)
आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना करण्याचे विधेयक संमत – १९९६ (वर्धा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ – नोव्हें. २००० (नागपूर)
महाराष्ट्रातील अभीमत विद्यापीठे – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज, भारती विद्यापीठ, वैकुठ मेहता महाराष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (सर्व पुणे) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT पवई), इंटननॅशनल इन्स्टिट्युट फॉर पॉप्युलेशन सानन्सेस (मुंबई)

विविध शंशोधन संस्था

सेंट्रल वॉटर अँन्ड पॉवर रिसर्च स्टेशन – खडकवासला (पुणे)
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मटेऑरॉलॉजी – पुणे
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिमोअमॅग्नरिझम – मुंबई
नॅशनल केमीकल लॅबोरेटरी – पुणे
भाभा ऑटोमॅटीक रिसर्च सेंटर – मुंबई
डाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे
नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज – नागपूर
स्कूल ऑफ आर्टीलरी – देवळाली (नाशिक)
राष्ट्रीय सेवा योजना सुरु – २ ऑक्टो. १९६९
सावित्रिबाई दत्तक पालक योजना सुरु – १८३-८४
नवे शैक्षणिक धोरण – ५+३+२+२+३ आकृतीबंध – १९८६
महाराष्ट्रातील पहिली रात्र शाळा – पुणे -१८५५
महाराष्ट्र पोलीस अँकेडमी – नाशिक – १९०६
महाराष्ट्रातील सध्याचे सरासरी आयुर्मान – ६४ वर्षे
राज्यातील हत्तीरोग शंशोधन केंद्र – वर्धा
राष्ट्रीय संघर्ष प्रबोधिनी – खडकवासला (पुणे)
महाराष्ट्र छात्रसेना – शाळेसाठी अनिवार्य व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे.
नॅशनल इन्व्हिरॉमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नेरी) – नागपुर
इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अँस्ट्रॉनॉमी अँन्ड अँस्ट्रोफिजिक्स (आयुका) – पुणे
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च इन म्यूमिस्मॅटिक स्टडीज – अंजनेरी (नाशिक)
शैक्षणिक धोरणाची मुलगामी चिकित्सा करण्यासाठी केंद्राचा आयोग – आचार्य राममुर्ती
महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना – पुणे, १९६७
७ व्या यौजनेत नवोदय विद्यालयांची स्थापना झाली. राज्यात ३२ विद्यालये असून यात ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. मुलींना १/३ आरक्षण असून ग्रांमीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ७५% जागा राखीव असतात.
महाराष्ट्रातील पहिले नवोदय विद्यालय – अमरावती
महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्र – खंडाळा, नाशिक, नागपुर, अकोल, जालना, सोलापूर, तासगांव (सांगली), मुंबई

विकास योजना व संकिर्ण माहिती

महाराष्ट्रात रोजगार हमी योजना वि.स.पांगे यांच्या शिफारसीवरून १९६५ मध्ये तसगाव (सांगली) येथे प्रायोगिक स्वरुपात सुरु झाली. हि योजना ग्रामीण भागातील अकुशल मजुरांसाठी आहे.
रोजगार हमी यौजना या नावाने व्यापक स्व्रुपात राबविण्यास सुरुवात – १९७२-७३
महाराष्ट्रात रोजगार हमीचा कायदा लागु – २६ जाने, १९७९
अवर्षन प्रवण विभाग कार्यक्रम सुरु – १९७४-७५
ग्रामसुधार कार्यक्रमांतगर्त ग्रामीण भागातील कार्यकर्यांना मार्गदर्शन करणारी शिबीरे – शिंदेवाडी (चंद्रपूर) व माजरी (पुणे)
पश्चिम घाटाच्या एकात्मिक विकासाची योजना – १९७४-७५
हुंडाग्रस्त व परितक्त्या स्त्रिया पुनर्वसनाची योजना – माहेर योजना
पुनर्वसन महासंचालक व IDBI यांच्या संयुक्त प्रयत्नाने माजी सैनिकांच्या स्वयंरोजगारासाठी कार्यान्वित योजना – सेमफेक्स योजना
एकात्मिक ग्रामीण विकास योजनेची सुरुवात – १९७८, व्यापक स्वरुपात सुरु – १९८०
२ ऑक्टोबर १९८० ला सुरु झालेल्या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पात्र व्यक्तीस दरमहा मिळणारी रक्कम – २५० रु.
१५ वर्ष राज्यात वास्तव्य असणा-या व्यक्तीस संजय गांधी स्वावलंबन योजनेखाली मिळणारे बिनव्याजी कर्ज – २५० रु.
दारिद्र रेषेखालिल कुटुंबांना २ रु. किलो दराने १० किलो दराने धान्य पुरविणारी राज्याची योजना – अन्नपुर्णा योजना
इंदिरा गांधी भूमिहीन वृध्द शेतमजूर सहाय्य योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीस दरमहा २५० रु. मिळतात. हिची सुरुवात – १९ नोव्हे. १९९१
ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील कुटुंबांना मोफत ३५,००० रु. किंमतीची घरे देण्याची योजना – इंदिरा आवास योजना
महाराष्ट्रात जानेवारी १९९३ मध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. जुन १९९४ मध्ये महिलांविषयी धोरण जाहिर करण्यात आले. हे पुरोगामी काम करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र राज्य
कार्यक्षमता तत्परता यांची वाढ होऊन विकासात्मक प्रशासनाची सुरुवात केली – लखिना पॅटर्न – अनिलकुमार लखिना
ग्रामसेवक व ग्रामसेवीकांना प्रशिक्षण देणारे केंद्र – मांजरी (पुणे)
महाराष्ट्र शासनाने अति मागास म्हणून जाहिर केलेल्या जमाती – माडिया गोंड (चंद्रपूर), कोळम यवंतमाळ नांदेड, कातकरी (रायगड)
कातकरी ही आदिवासी जमात आढळणारे जिल्हे – ठाणे, रायगड
कोकरु हि आदिवासी जमात आढळते – अमरावती
नंदुरबार व धुले या जिल्ह्यात सातपूडा भागात अढळणारी जमात – भिल्ल
नाशिक जिह्यात अढळणारी आदिवासी जमात – ठाकूर, महादेव, कोळी
इतर जमाती – वारली (सह्याद्री), लमाण (मध्य महाराष्ट्र), बेरड (ढोर), द. महाराष्ट्र, रामोशी(मध्य महाराष्ट्र), पारधी, ठाकुर, भील्ल, कतोडी (ठाणे), कोय, हळबा (अमरावती)
सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी नंदुरबार जिल्ह्यात तर लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात जास्त आहे.
महाराष्ट्र गृह विकास क्षेत्र निर्माण प्रधिकरण (म्हाडा) ची स्थापना – १९७७
प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास क्रुन उपाय सुचविण्यासाठी १९८३ मध्ये नेमलेली समिती – वि.मा.दांडेकर
राज्याच्या स्वयंरोजगार केंद्रात २००७ अखेर नोंदणी झालेल्य बेरोजगारांची संख्या – ३२२,१३,८२२
महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेवरून प्रेरणा घेऊन भारताने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम सुरु केला – २ फेब्रुवारी २००६
डिसेंबर २००९ पासून नामकरण – महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना
राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन सुरु – १२ एप्रिल २००५
६५ वयांवरील निराश्रीत वृध्दांना राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाद्वारे दरमहा मिळणारे पेन्शन – २०० रु.
सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना – १ एप्रिल १९९९

भारत निर्माण योजना –

१ करोड हेक्टर अतिरिक्त जमीन सिंचनाखाली आनणे.
१ हजार (पर्वतीय/अनुसुचित जमाती क्षेत्रात ५००) लोकसंख्येची गावे रस्त्याने जोडणे.
दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी ६० लाख अतिरिक्त घरे बनविणे.
७४ हजार वस्त्यांना पेय जल पुरविणे.१,२५,००० गावांचे विद्युतीकरण करणे व २.३ करोड कुटुंबांना विज देणे.
६६,८२२ गावांना टेलिफोन लाईन जोडणे.
वरिष्ठ नागरीकांना एस.टी.च्या भाड्यांपैकी प्रवासासाठी ५०% सवलत देणे.
सर्वशिक्षा अभियान – २००१ अंतर्गतः२०१० पर्यंत ६ ते १४ वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण उपलब्धकरून देण्याचे ध्येय आहे.



एम.पी.एस.सी.- सहायक परीक्षा – २०१२

जिंका “सीईटी’ची लढाई

फायनान्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

MPSC स्पर्धा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम

यूपीएससी : नागरी सेवा परीक्षा

अडचणींचा सामना करून त्यांचे रूपांतर संधीमध्ये करा

देशात उच्च शिक्षणाचा विस्तार

व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी सुख अन् दु:खही महत्त्वाचे

स्पर्धा मंत्र एक आशा! यशासाठी एक नवी दिशा!!

स्पर्धा परीक्षांची ओळख करुन देणारी एकमेव मराठी वेबसाईट- स्पर्धा मंत्र डॉट कॉम

पक्षाशी गद्दारी करणार्‍यांची राजकडून झाडाझडती

श्यामची आई इंग्रजी नाटकाचा दिग्दर्शक

आता नरेंद्र मोदींना ब्रिटनमध्ये बंदी, आज होणार नियमावर शिक्कामोर्तब

IPL : मुंबईचा डेक्कनवर पाच गडी राखून विजय, रोहित-मलिंगा चमकले

चंद्रपुरात शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसच्या अमृतकर महापौर; नाशकातील वचपा काढला

आरुषी हत्याकांड : नूपुर तलवार सीबीआयला शरण

औरंगाबादेत होणार राज्यातील सर्वात मोठा साडेपाच किलोमीटरचा बोगदा

‘आयटी’ देणार 2 लाख नोक-या

गायिका अ‍ॅडेलेला 6 ग्रॅमी पुरस्कार

ज्ञानपीठविजेते शायर शहरयार यांचे निधन

Tuesday 1st May 2012 मे १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२१ वा किंवा लीप वर्षात १२२ वा दिवस असतो. ठळक घटना आणि घडामोडी अकरावे शतक

१०४५ - ग्रेगोरी सहावा पोपपदी.

चौदावे शतक

१३२८ - एडिनबर्ग-नॉर्थहॅम्पटनचा तह - इंग्लंडने स्कॉटलंडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली.

अठरावे शतक

१७०७ - ऍक्ट ऑफ युनियन - इंग्लंड व स्कॉटलंडने एकत्र येउन ग्रेट ब्रिटन या राष्ट्राची निर्मिती केली.

एकोणिसावे शतक

१८३४ - इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य ठरवण्यात आली.
१८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-चान्सेलरव्हिलची लढाई.
१८८६ - या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
१८९८ - मनिला बेची लढाई - अमेरिकेच्या आरमाराने स्पेनची जहाजे बुडवली.

विसावे शतक

१९०० - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार.
१९३० - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
१९३१ - न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली.
१९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला.
१९४८ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
१९५० - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.
१९५६ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
१९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
१९६० - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले.
१९७८ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला.

एकविसावे शतक

२००३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले.

जन्म

१२१८ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
१९१५ - 'अंचल' रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी
१९२० - मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक
१९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.
१९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

४०८ - आर्केडियस, रोमन सम्राट.
१३०८ - आल्बर्ट पहिला, हॅब्सबर्गचा राजा.
१५७२ - पोप पायस पाचवा.
१९३१ - योहान लुडविग बाख, जर्मन संगीतकार.
१९४५ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
१९७२ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
१९९३ - पिएर बेरेगोव्होय, फ्रांसचा पंतप्रधान.
१९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.
१९९३ - नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.
१९९४ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.
१९९८ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
२००२ - पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.

प्रतिवार्षिक पालन

महाराष्ट्र दिन - महाराष्ट्र.
गुजरात दिन - गुजरात.
कामगार दिन - अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.
लेइ दिन - हवाई.
बेल्टेन - आयर्लंड.
राष्ट्रीय प्रेम दिन - चेक प्रजासत्ताक.
कायदा दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने.

६ टिप्पण्या: