Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

भूगोल / पर्यावरण


भूगोल / पर्यावरण


गिधाड रेस्टॉरंट उपक्रम :

रायगड जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्यात चिखलगाण जवळ दुर्मिळ होत चाललेल्या गिधाड पक्षाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत जवळच्या गावातील मेलेले प्राणी तेथे आणून टाकले जातात.

परिणामी या पक्षांना अन्न मिळते.

नायजेरिया हा देश जगातील एक प्रमुख तेल उत्पादक म्हणून ओळखला जातो .

दिओयू (सेन्काकू) बेट : चीनच्या पूर्व किनारपट्टीवरील या बेटामुळे चीन व जपान या दोन देशा दरम्यान विवाद निर्माण झालेले आहे

या बेटावर तेल व नैसर्गिक वायुचे साठे आधळून आले आहेत.

हुमन जलसींचन प्रकल्प :

हुमन नदीवर सिरकाडा गावाजवळ चंद्रपूर जिल्ह्यात या प्रकल्पाच्या उभारणीस महाराष्ट्र शासनाने मंजूर दिलेली आहे.

राष्ट्रकुल संघटनेने सन २०१० हे वर्ष आंतराष्ट्रीय जैविविधता वर्ष म्हणून साजरे केले.

लेह ( जम्मू काश्मीर ) येथे पर्यावरण संवर्धनासाठी एकाच तासात सर्वाधिक झाडे लावण्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली.

औषधी दृष्टीकोनातून उपयोगी असणारी नरक्या ही वनस्पती सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तस्करी केली जाते.

कळणे, जिल्हा सिंधूदुर्ग येथे खाण खोदण्याच्या विरोधत लोकांनी आंदोलन केल्याने चर्चेत आले.

पिवळा समुद्र/ पित समुद्र :

हा समुद्र प्रशांत / पॅसिफिक महासागराचा उपसागर आहे.

पूर्व चीन आणि दक्षीण व उत्तर कोरिया यांच्या दरम्यान हा पित समुद्र आहे.

जगातील सर्वात मोठा बोगदा आल्पस पर्वत रांगेत स्विर्त्झलँडमध्ये खोदण्यात येत आहे.

५७ कि.मी. लांबीच्या या बोगद्याने स्विर्त्झलँडमधील झु्रीच व मिलान हे आंतर कमी होईल .

आल्पस पर्वत रांग युरोप खंडामध्ये पूर्व – पश्चिम दिशेने पसरलेली आहे.

अन्न आणि कृषी संघटना :

ही संघटना संयुक्त राष्ट्रसंघाने १६ ऑक्टोबर १९४५ रोजी स्थापना केली.

म्हणून १६ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अन्नधान्य म्हणून साजरा केला जातो.

कोळशाचे उत्पादन करणारी जगातील सर्वत मोठी कंपनी – कोल इंडिया लिमिटेड.

भारताच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी सुमारे ४८ टक्के उत्पादन कोल इंडिया लिमिटेड घेते.

सन २०१० मध्ये थायलंड देशात महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती.

मार्सेलिस बंदर फ्रान्समध्ये आहे.

मेगी चक्री वादळ :

फिलिपाइनची राजधानी मनिलाच्या उत्तरेस या चक्रवादळाने ऑक्टोवर २०१० मध्ये तडाखा दिला.

नंदनकानन पाणी संग्रहालय –भुनेश्वर (ओरिसा).

थ्री गॉर्जेस धरण :

जगातील हे सर्वात मोठे धरण चीनमध्ये हुबई प्रांतात यिचांग येथे यांगत्से नदीवर उभारले जात आहे .

या धरणाची उंची १७५ मीटर पर्यंत झाली आहे.

लेथांग जलविद्यूत प्रकल्प – सिक्कीम

पोबीतोर अभायारण्य व काझीरंगा अभयारण्य – आसाम

या दोन्हीही अभयारण्य आसाम राज्यात असून एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे

त्रिवेंद्रम ( तिरुअनंतपूरम ) ते लोकमान्य टिळक टर्मिनन्स मुंवई या दरम्यान मत्स्यगंधा रेल्वे एक्सप्रेस धावते.

जाल चक्रवादळ :

भारताच्या पूर्व किनारपट्टीला तामिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्याच्या किनारी भागात या चक्रवादळाने नोव्हेंबर २०१० मध्ये तडाखा दिला.

देशात नवीन आठ व्याघ्र प्रकल्प स्थापन करणार :

सध्या देशात ३९ व्याघ्र प्रकल्प आहेत.

तामिळनाडूमध्ये सत्यमंगलम एरोडा या जंगलात जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्रात बोर व्याघ्र प्रकल्प जिल्हा वर्धा आणि नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्प जि.गोंदिया हा जाहीर करण्यात आला.

पोला वरम प्रकल्प :

गोदावरी नदीवर आंध्र प्रदेश आणि ओरिसा ही दोन सरकारे संयुक्त प्रकल्प उभारत आहे. –

ओरिसामधील दंतेवाडा जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली जात असल्याने यास ओरीसा विरोध करीत आहे.

अंबरनाथ जि. ठाणे :

येथे देशातील पहिला आगकाडी उत्पादन करणारा कारखाना – विमको कंपनी.

ही विमको कंपनी नोव्हेंबर २०१० मध्ये बंद करण्यात आली.

जगात सर्वात जास्त वाघांची संख्या भारतात आहे. – १४११.

देशात सर्वाधिक पक्षांसाठी राखीव असणारी नऊ अभयारण्य असणारे राज्य – महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये ३५ अभयारण्य आणि ६ राष्ट्रीय उद्याने, ६ व्याघ्र प्रकल्प आहेत.

दक्षिण ध्रुवावर पोहचणारे पहिले भारतीय वैज्ञानिक पथक – नॅशनल सेंट्रल फॉर अंटार्क्टिक अण्ड ओशन रिसर्च (नोव्हेबर २०१०)

आशियाच्या दक्षिण भागातील अरबी समुद्र , बंगालचा उपसागर , तांबडा समुद्र पार्शियाचे आखात आणि बाब अल मंडेब, होमुर्झ , मलाक्का , सुंदा व लँबॉक या सामुद्र ध्वनी हिंदी महासागराचाच भुभाग आहेत.

आसाम राज्यातील खनिज तेल उत्पादन :

देशातील पहिली खनिज तेल विक्री आसाममध्ये १८८९ साली दिग्बोई येथे खोदण्यात आली.

१९५५ नंतर आसाममध्येच नरहरकटिया आणि मोरान येथील तेल खाणीतून उत्पादन सुरु झाले.

ओएनजीसी – विदेश ही भारताची कंपनी व्हिएतनाम , रशियातील साखलीन , सुदान या देशामध्ये खनिज तेल उत्पादनाचे काम करीत आहे.

आंध्र प्रदेशच्या पूर्व किना-यावरील केजीडी -६ ब्लॉक नैसर्गिक वायु क्षेत्र रिलायन्स उद्योग समुहाच्या मालकीचे आहे.

मुंबई हाय खनिज तेल क्षेत्र :

मुंबई हायच्या बाजुला असणा-या अरबी समुद्रातील वसई, पन्ना, मुक्ता, हिरा, निलम, लक्ष्मी , गौरी , आणि तापी या खनिज तेल खाणीमध्ये उत्पादन घेतले जाते.

अर्जून कोंडा (आंध्र प्रदेश) :

येथे दरवर्षी डिसेंबर २०१० मध्ये प्राणहिता पुष्कर मेळावा भरतो, यावेळी अनेक भाविक येथे गोदावरी नदीवर स्नान करतात.

अर्जून कोंडा येथे प्राणहिता, इंद्रावती, गोदावरी या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम होतो.

प्राणहिता चेवेल्ला धरण तुडीहट्टी जिल्हा आदिलाबाद ( आंध्र प्रदेश)

येथे गोदावरी नदीवर धरण बांधण्याची घोषणा आंध्र प्रदेशांनी केली आहे.

महाराष्ट्राने हे धरण बांधण्यास विरोध दर्शविला आहे.

भूशी धरण – लोणावळा, जि. पुणे येथे आहे.

पनामा कालवा प्रथमच बंद :

प्रशांत महासागर व ऍटलांटीक महासागर यांना जोडणारा पनामा कालवा डिसेंबर २०१० मध्ये या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रथमच वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.

हा कालवा पनामा या देशाच्या मध्यवर्ती भागात आहे. यावरती अमेरिकेचे प्रभुत्व आहे.

सेव्ह टायगर या कॅम्पनचे ब्रँण्ड ऍम्बेसेडर अमिताभ बच्चन हे आहेत.

भारत हा जैविक विविधतेने नटलेला जगातील तिसरा देश आहे.

महाराष्ट्र कोकण खोरे विकास महामंडळ स्थापना – १९९७.

कृष्णा खोरे विकास महामंडळ – स्थापना – १९९६.

विदर्भ विकास महामंडळ – स्थापना – १९९७.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ स्थापना – १९९७ .

तापी खोरे विकास महामंडळ – स्थापना – १९९७.

गोदावरी खोरे विकास महामंडळ – स्थापना – १९९८.

कोळसा आयात – निर्यात :

जगात सर्वात जास्त कोळसा निर्यात ऑस्ट्रेलिया हा देश करतो .

चीन व ऑस्ट्रेलिया या देशाकडून भारत औष्णीक ऊर्जा निर्मितीसाठी दगडी कोळसा आयात करतो आहे.

कृष्णा नदी पाणीवाटप तंटा लवाद :

या लवादाने आपला अहवाल डिसेंबर २०१० मध्ये सादर केला या लवादाच्या निर्णयानुसार आंध्र प्रदेश राज्याला सर्वाधिक पाण्याचा वाटा मिळाला.

न्यायमुर्ती ब्रिजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हा लवाद स्थापन करण्यात आला होता.

या लवादाने आंध्र प्रदेशला १००१ टिएमसी, कर्नाटक ९११ टिएमसी तर महाराष्ट्राला ६६६ टिएमसी एवढे पाणि दिले आहे .

कर्नाटकमधील कृष्णा नदीवर असणा-या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिली .

हा आयोग २ एप्रिल २००४ रोजी स्थापन करण्यात आला होता.

यापुर्वी न्यायमुर्ती बच्छावत आयोग सन १९७६ साली नेमला होता. त्याने महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्याला कृष्णा नदी पाणीवाटप तंट्यानुसार पाण्याचे समान वाटप केले होते .

या लवादानुसार कोयना जलाशयात अतिरिक्त पाणीसाठा करण्यास मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध केला आहे कारण २००५ साली आलेल्या महापूराच्या वेळी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गांवे या धरणातील पाण्यामुळे पाण्याखाली गेली होती.

मंगलोर (कर्नाटक) – येथे खनिज तेल शुध्दीकरण प्रकल्प आहे.

गुजरातमधील प्रमुख बंदरे – दहेज, हाजिरा, मुंद्रा, पिपागाव.

भारती –अंटार्क्टिका संशोधन स्थळ :

दक्षिण गंगोत्री (१९८४) मैत्री (१९९१) या नंतर भारती हा तिसरा संशोधन स्थळ अंटार्क्टिका स्थळावर देशातील एकूण ९ देश संशोधन करीत आहे.

हुसेन सागर जलाशय / तलाव हैद्राबाद शहरात आहे.

महाराष्ट्रात नागझिरा- नवेगाव बांध जि. भंडारा व गोंदिया आणि बोर अभयारण्य (नागपूर व वर्धा ) येथे दोन नवीन व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले

महाराष्ट्रात पूर्वी चार व्याघ्र प्रकल्प होते, यापुढे सहा होतील.

महाराष्ट्रात प्रमुख अभयारण्य :

कर्नाळा पक्षी : रायगड , गौताळा – औट्रमघाट = औरंगाबाद व जळगाव , राधानगरी = कोल्हापूर , जायकवाडी = औरंगाबाद , नायगाव : मयुर = बीड हे अभयारण्य मोरांसाठी राखीव = आशिया खंडातील पहिले, यावल = जळगाव , मेळघाट = अमरावती

केंद्र सरकारने गंगा नदीला ‘ राष्ट्रीय नदी’ म्हणून जाहिर केले आहे.

धरणे – नदी – राज्य :

नागार्जुनसागर – कृष्णा –नंदिकोना येथे आंध्रप्रदेश ,

काक्रापार = तापी –गुजरात,

उकाई = तापी – गुजरात

कृष्णराज सागर = कावेरी – म्हैसुर – कर्नाटक

भाक्रा :सतलज = हिमाचल प्रदेश

नांगल = सतलज – पंजाब

जायकवाडी = गोदावरी – महाराष्ट्र

ग्रीन हाऊस इफेक्ट या पृथ्वीचे तापमान वाढविणा-या वायुमध्ये कार्बन डायऑक्साईड , मिथेन याचे प्रमाण जास्त असते.

सिंगापूरमध्ये पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे.

महाराष्ट्रात मुंबई शहरात समुद्राच्या पाण्यापासून गोड्या पाण्यात रुपांतर करण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.

बेलीकेरी आणि कारवार ही प्रसिध्द बंदरे कर्नाटक या राज्यात आहे . या बंदरात लोहखनिज निर्यात केली जाते.

छत्तीसगढ मध्ये माडीया, गोंड, डराव या आदिवासी जमाती आहेत.

चीन मधील दगडी कोळसा खाणी असणारा प्रांत – हेनान.

महाराष्ट्र वन विभाग रिसर्च इन्स्टीट्यूट – पूणे येथे आहे.

महाराष्ट्रात अकरा जिल्ह्यात १०% पेक्षा कमी जंगल आहेत म्हणून या जिल्ह्यात वृक्ष तोडीवर बंदी महाराष्ट्र शासनाने घातलेली आहे.

महाराज बाग प्राणी संग्रहालय नागपूर येथे आहे.

नवी मुंबई विमानतळ उभारणी विषयीचा विवाद.

महाराष्ट्र शासनाने काळविट/ हरीण प्रकल्प कारंजा, जि. वाशीम आणी तलवडा, जि. औरंगाबाद येथे उभारण्यास मान्यता दिली आहे.

ओरिसामधील नियमागिरी पर्वतात वेदांत उद्योग समूह बॉक्साईड खाण प्रकल्पास केंद्र सरकारने खोदण्यास मनाई केली.

वेदांत उद्योग समूह हा इंग्लीडमधील प्रसिध्द कंपनी आहे.

ओरिसा राज्यात कलहांडी जिल्ह्यात नियमागिरी ही पर्वतरांग आहे. या पर्वत रांगेत बॉक्साईड हे खनिज सर्वात जास्त सापडते.

जगातील सर्वात जास्त पर्जन्य/पाऊस पडणारे ठिकाण – चेरापुंजी (मेघालय). चेरापुंजीचे नवीन नाव सोहरा.

ई कचरा – यामध्ये निरुपयोगी ठरलेली इलेक्ट्रिक आणी इलेक्ट्रॉनिक उपकरणे , टाकाऊ घरगुती उपकरणे , कम्प्युटर मोबाईल ,त्यांचे सुटे भाग, वीज जोडणीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे सर्व प्रकारची इलेक्ट्रीकल वैद्यकीय उपकरणे , इलेक्ट्रॉनिक उत्पादने , बॅटरीवर चालणारी खेळणी इत्यादी सगळ्याचा समावेश होतो. ई- कचरा तयार करणारे देशातील प्रथम क्रमाकांचे राज्य महाराष्ट्र ,दुसरा तामिळनाडूचा लागतो.

सर्वात जास्त ई – कचरा निर्माण करणारी शहरी – मुंबई प्रथम क्रमांक , दिल्ली द्वितीय क्रमांक , बंगलुरू तृतीय क्रमांक.

सीनाबंग हा ज्वालामुखी जागृत झाला, इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर हा ज्वालामुखी आहे.

ऍटलांटीक महासागरात बर्मुडा ट्रँगल आहे.

या बर्मुडा ट्रँगल प्रदेशात प्रवेश करणारी जहाजे अचानक गायब होतात, तसेच आकाशातून उडणारी विमानेही अदृश्य होतात.

या बर्मुडा ट्रँगल अमेरिकेच्या दक्षिणेस बर्मुडा, मियामी, फ्लोरीडा, शानज्युऑन , प्युअर्टो रिको या बेटांच्या दरम्यानचा प्रदेश बर्मुडा ट्रँगल म्हणून ओळखला जातो.

नॅशनल हेरीटेज ऍनिमल म्हणून हत्ती या प्राण्यास घोषीत करण्यात आले.

मिथेन हा वायू ग्लोबल वॉर्मिंग घडवून आणण्यामध्ये दुस-या क्रमांकावर आहे.

कार्बन डायऑक्साईड हा प्रथम क्रमांकावर असून क्लोरो फ्लोरो कार्बनमुळे ही ग्लोबल वॉर्मिंग होण्यास मदत होते.

शास्त्रज्ञांना लोणार जि.बुलढाणा येथील सरोवरात मिथेन वायू खाणारे जीवाणू /बॅक्टेरिया सापडले आहेत.

चांदोली राष्ट्रीय उद्याना ( जि. सांगली ) मधून वारणा नदी वाहते, या नदीवर वारणा धरण उभारलेले आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प , जि. नागपूर – याच्या सभोवतालचा परिसर बफर झोन म्हणून केंद्र सरकारने जाहीर केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेस केप ल्युवीन , दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेस केप हॉर्न , आफ्रीका खंडाच्या दक्षिणेस केप ऑफ गुड होप ही भुशीरे आहेत.

एव्हरेस्ट शिखर सरकरणारा सर्वात तरूण गिर्या रोहक – अर्जून बाजपेयी ( नवी दिल्ली ) एव्हरेस्ट शिखर विक्रमी २० वेळा सर करणारे अपाशेर्पा हे आहेत.

कोसी :

या नदीला बिहारचे अश्रू असे म्हणतात.

ब्रह्मपुत्रा नदीची सर्वात मोठी उपनदी = सुबानसिरी (आसाम)

वनक्षेत्र महाराष्ट्र :

महाराष्ट्रात सध्या = २०.१३ टक्के वनक्षेत्र आहे.

सरदार सरोवराच्या उंची वाढीस विरोध करणा-या नेत्या : श्रीमती मेधा पाटकर

राष्ट्रीय हवामान वेधशाळा = पुणे

महाराष्ट्रातील सहा नॅशनल पार्क :

१) महाराष्ट्रात ६ वे राष्ट्रीय उद्यान ( नॅशनल पार्क ) घोषित केले = चांदोली नॅशनल पार्क हे सातारा , सांगली , कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सह्याद्रीच्या कुशीत आहे.

२)संजय गांधी नॅशनल पार्क : बोरिवली – मुंबई

३)पेंच नॅशनल पार्क : जि. नागपूर

४) नवेगाव बांध नॅशनल पार्क : जि. अमरावती

५) ताडोबा नॅशनल पार्क : जि. चंद्रपूर

महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस अंबोली, जि. सिंधुदुर्ग येथे पडतो.

द्वितीय क्रमांकाचा पाऊस महाबळेश्वर ,जि.सातारा येथे पडतो.

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोकण या विभागात पडतो .

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील जंगल हे जगातील ३४ घनदाट जंगलामध्ये समाविष्ट केलेले आहे.

मुंबई शहराला पाणी टंचाई पासुन मुक्त करण्यासाठी अरबी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबविण्याचा शासन विचार करित आहे.

ढोल तलाव – अहमदाबाद (गुजरात)

केवल देव नॅशनपार्क पूर्वी भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून राजस्थान मध्ये ओळखले जात होते.

चीनने २०१० हे वर्ष ‘ईयर ऑफ टायगर’ म्हणून जाहिर केले.

भारतीय वन्य जीव संस्था : डेहराडून (उत्तराखंड)

सुंदरबन त्रिभूज प्रदेश निर्मीती तीन नद्यांच्या संचयनामुळे झाली = गंगा , ब्रह्मपुत्रा, सुरमा

युनेस्कोने या परिसराला जागतिक हेरिटेज म्हणुन जाहिर केले.

प्रदुषण मुक्तीसाठी सी.एन.जी. गॅसवर बस चालविणारे शहर – दिल्ली

देशातील सर्वाधिक प्रदुषण असणार जिल्हा = चंद्रपूर

देशातील ९ राज्यांना व ४ केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लाभला आहे

९ राज्य = गुजरात, महाराष्ट्र , गोवा, कर्नाटक , केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल.

४ केंद्रशासित प्रदेश = दमण व दिव , लक्षद्विप , अंदमान आणी निकोबार , पदुच्चेरी

(पाँडेचेरी)

चीनला किती देशांची सीमा लागुन आहे. : २२

डॉल्फिन माशाला सरकारने राष्ट्रीय जल प्राणी म्हणुन मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, कोयना धरणाला म्हणतात.

हे धरण कोयना नदीवर हेळवाक येथे ता.पाटण जि. सातारा येथे उभारलेले आहे.

या धरणातील जलाशयाला शिवाजीसागर/ शिवसागर म्हणतात. या धरणाला ६ दरवाजे /गेट आहेत.

नीरा नदी उगम = रायरेश्वर , भोर जि. पुणे

नीरा नदीवरील धरणे : भाटघर व वीर (जि. पुणे )

मांजुली बेट : हे बेट ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहमार्गात आसाम राज्यात आहे.

जगातील बर्फाच्छादीत पर्वतरांग : हिमालय, अँडीज ,आल्प्स, किलिमांजारो.

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प / उद्यानात ‘तोतलाडोह’ हे धरण आहे.

पेंच नदीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांनी संयुक्त जलविद्युत प्रकल्प उभारला आहे.

महाराष्ट्र व गोवा दरम्यान सिंधूदुर्ग जिल्ह्यात तेरेखोल खाडी / नदी आहे.

भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र प्रकल्प ( जि. अमरावती)

हा व्याघ्र प्रकल्प सातपुडा पर्वतरांगेत आहे.

1 टिप्पणी: